नाशिक – कश्यपी धरणावर धुळवड साजरी करण्यासाठी योगिता राजेश कांबे या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली. धुळवड साजरी करण्यासाठी दोन महिला आणि दोन पुरुष गेले होते. पण, यातील योगिता कांबे यांचा मृत्यू झाला. सर्वत्र धुळीवंदन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांनाच या घटनेमुळे गालबोट लागले. या घटनेनंतर सातपूर अग्निशमन दलास कळवण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी आर. सी. मोरे, एस. एम जाधव, एस. आर. पगार, सी. एस. उन्हाळे, व्ही. एस. वावडे यांच्या मदतीने बोटीच्या गळाच्या सहाय्याने या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. योगिता राजेश कांबे (वय ३० ) या नाशिकरोड येथील रहिवाशी आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार बोंबले करत आहेत.