मुंबई – कमी वयात श्रीमंत होण्याची स्वप्न बघणे वेगळे आणि कमी वयात गुंतवणुकीच्या माध्यमातून करोडपती होणे पूर्णपणे वेगळे. पण कमीत कमी वेळेत जास्त फायदा मिळविण्याच्या नादात आपण बरेचदा स्वतःचे नुकसान करून बसतो. तुम्हीही चाळीशीत करोडपती होऊ शकता, फक्त त्यासाठी तुम्हाला करावी लागेल विशिष्ट्य गुंतवणुक. म्युच्युअल फंड एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) योग्य वेळी सुरू केले तर चाळीस वर्षापर्यंत तुम्ही करोडपती होऊ शकता.
बरेचदा कुठे, कशी आणि किती गुंतवणुक आवश्यक आहे, याची माहिती नसते. महिन्याच्या एसआयपीवर बोलताना एक तज्ज्ञ सांगतात की एसआयपी रिटर्न कॅलक्युलेटरनुसार जर १० वर्षांपेक्षा अधिक काळासाठी आपण गुंतवणुक केली, तर सरासरी ८ ते १२ टक्के रिटर्न मिळू शकतात. त्यामुळे जर गुंतवणुकदाराला ४० वर्षाच्या वयात करोडपती व्हायचे असेल तर म्युच्युअल फंड सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र यात रिस्कही तेवढीच आहे, हे महत्त्वाचे.
एसआयपी करायची म्हणजे काय करायचे हेही जाणून घेतले पाहिजे. सिंपल एसआयपी करून करोडपती होण्याचे स्वप्न बघता येणार नाही. ४० व्या वर्षी करोडपती होण्यासाठी गुंतवणुकदारांना इक्विटी म्युच्युअल फंडाकडेही लक्ष द्यावे लागेल. यात कमीत कमी १२ टक्के रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. वयाच्या २५ व्या वर्षी एसआयपी सुरू करणे आवश्यक आहे. सामान्यतः वर्षाची एसआयपी १० ट्कके असायला हवी, असे यातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.