इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या देखील महाराष्ट्र कर्नाटक वरील सीमावाद आणि तेथील काही गावांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. याला कारण म्हणजे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले कथित विधान होय. त्यानंतर महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकात दि. ३ डिसेंबरला जाणार होते. परंतु ती तारीख लांबली त्यानंतर मंगळवार, दि. ६ डिसेंबर रोजी हे दोघे मंत्री कर्नाटकात रवाना होण्यापूर्वी पुन्हा एकदा मुख्यमंत्री बोम्मई यांनी इकडे येऊ नका, असा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मंत्री जर बेळगावात आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. इतकेच नव्हे बेळगावमध्ये येण्याचे धाडस केल्यास कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असा इशाराही बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना दिला आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई या दोन्ही मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच खुलासा करताना सांगितले की, आमच्या मंत्र्यांना कोणी रखू शकत नाही परंतु एकूणच हा प्रश्न सुप्रीम कोर्टात असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तूर्तास तरी मंत्र्यांचा दौरा थांबविण्यात आला असून भविष्यात ते मंत्री पुन्हा तिकडे जाऊ शकतात असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
karnataka CM Bommai on Maharashtra Ministers Threat