इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात वीर सावरकरांचा फोटो लावण्यावरून मोठा गदारोळ झाला. त्याविरोधात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह अन्य नेत्यांनी विधानसभेबाहेर निदर्शने केली. आजचे विधिमंडळाचे कामकाज प्रारंभीच वादळी ठरले आहे. अन्य महापुरुषांचेही फोटो लावावेत, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली आहे.
याप्रकरणी काँग्रेस नेते म्हणाले की, सत्ताधारी पक्ष ‘भाजप’ला सभागृहाचे कामकाज चालू नये अशी इच्छा होती, त्यामुळे ते स्वतःच व्यत्यय आणू इच्छित आहेत. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार डीके शिवकुमार म्हणाले की, त्यांना सरकारविरोधात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे मांडायची होती. पण, सत्ताधारी सरकारकडे विकासाचा अजेंडा नाही. म्हणून त्यांनी सावरकरांचे चित्र समोर आणून वाद निर्माण केला. त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही.
वाल्मिकी, आंबेडकर, पटेल यांचेही फोटो लावा
काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी सभापतींना पत्र लिहून मागणी केली की, वाल्मिकी, बसवण्णा, कनक दास, बी. आर. आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर नेत्यांची छायाचित्रेही लावावीत. हा आमचा निषेध नसून इतर समाजसुधारकांचे फोटोही विधानसभेच्या सभागृहात लावावेत, अशी मागणी असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले. भाजपने मनमानीपणे फक्त सावरकरांचा फोटो लावला आहे. मी कोणाचेही चित्र लावण्याच्या विरोधात नाही. कायदा आणि सुव्यवस्थेसह सर्व खर्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकार अशी पावले उचलत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सावरकर एक वादग्रस्त व्यक्तिमत्व : सिद्धरामय्या
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सावरकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले होते. या चित्राच्या अनावरणाच्या संदर्भात मला कोणतेही निमंत्रण देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. हा भाजपचा अजेंडा आहे. महात्मा गांधींच्या हत्येत सावरकरांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. ते एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे.
दरम्यान, वीर सावरकरांवरून देशात वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्याबाबत देशात अनेक वाद निर्माण झाले आहेत. अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, देशात एकीकडे वीर सावरकर आहेत तर दुसरीकडे महात्मा गांधींच्या विचारांमध्ये संघर्ष आहे.
https://twitter.com/ANI/status/1604705291760959488?s=20&t=sycoDnq9JhL0dkLpcHcs2w
Karnataka Assembly Controversy Savarkar Portrait