नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वासजी काटकर यांनी नाशिक दौरा करुन कर्मचा-यांशी सुसंवाद साधला. या दौ-यात त्यांनी जिल्हा वित्त व कोषागार कार्यालय, विभागीय पोलीस आयुक्त कार्यालय, विभागीय समाज कल्याणआयुक्त कार्यालय येथे कर्मचारी बांधवांना प्रत्यक्ष भेट देऊन सुसंवाद साधला. यावेळी त्यांनी जुनी पेन्शन योजना लागु करणे, बक्षी समीतीचा अहवाल खंड -२ लवकर जाहीर करणे व इतर प्रलंबीत मागण्या बाबत, नविन पेन्शन कशी कर्मचारी सुरक्षेसाठी घातक आहे, याबद्दल सविस्तर माहिती दिली. जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल आणि संघर्षासाठी एकजुटीने सज्ज रहावे असे ही त्यांनी सांगितले. कर्मचारी बांधवांचे वैयक्तिक, सामुदायिक प्रश्न, अडीअडचणी जाणून घेतल्या व निराकरण केले. यावेळी नाशिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, सरचिटणीस सुंनदा जंराडे, संपर्क प्रमुख श्यामसुंदर जोशी, राज्य संघटक श्रीमती जिजा गवळी, उपाध्यक्ष अर्चना देवरे, जगदीश घोडके, प्रसिद्धी प्रमुख डी जी.पाटील ,महसुल संघटनेचे अध्यक्ष तुषार नागरे, सरचिटणीस जीवन आहिरे यांनी विश्वास काटकर, यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधला. याप्रसंगी सर्व कर्मचारी बांधवांनी अतिशय उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत आपल्या अडचणी व्यक्त केल्या. यावेळी पोलीस विभागीय आयुक्तालयाच्या सौ अवताडे मॅडम, श्री भोईर, समाज कल्याण कार्यालयाचे श्री तिदमे साहेब यांनी काटकर साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आभार व्यक्त केले.