नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या २०२५-३० च्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम अध्यक्ष दिनेश वाघ यांनी जाहीर केला आहे. १८ जानेवारी २०२५ रोजी या निवडणुकीसाठी मतदान व मतमोजणी होणार आहे. या सर्व निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय़ अधिकारी उत्तमराव रामचंद्र गांगुर्डे तर सहाय्यक म्हणून दिलीप थेटे, मधुकर कांगणे,महेश आव्हाड व रमेश जगताप यांची नियुक्ती वाघ यांनी केली आहे.
या संघटनेचे जिल्ह्यात आम सभासद ३९२ इतके सभासद आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, आदिवासी आयुक्त कार्यालय, मेरी, जलसंपदा, दुध डेअरी, वनविभाग, कारागृह कर्मचारी, शिक्षण विभाग, मत्स विभाग कर्मचारी, जिल्हा रुग्णालय, सेवा संदर्भ, सहकार, आयटीआय, कामगार आयुक्त, उद्योग भवन, ईसआय, एक्साईज, जीएसटी, भूमीअभिलेख, धर्मादय आयुक्त कार्यालय, फॅारेन्सीक लॅब, पशुसंवर्धन व राज्य सरकारी कर्मचारी या संघटनेत आहे.
या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम बघा….