मुंबई – अभिनेत्री करिना कपूर नेहमी विविध कारणाने चर्चेत राहते. सोशल मिडियात ती खुपच सक्रीय असते. म्हणून ती चाहत्यांसाठी विविध फोटो आणि पोस्ट टाकत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत तिने लग्न केले आहे. करिना आणि सैफ यांना तैमूर आणि सैफिना ही मुले आहेत. डिस्कव्हरी चॅनलसाठी सध्या ती एक शो करते आहे. त्याच्या शुटींग दरम्यान तिने एक खास सिक्रेट सांगितले आहे. मैत्रिण तान्या घावरी हिच्यासोबत बोलताना करिनाने सांगितले की, मी माझ्या बेडरुममध्ये जाते तेव्हा बेडवर जाण्यापूर्वी मला ३ गोष्टी लागतात. एक म्हणजे, वाइनची बॉटल, दुसरे म्हणजे पायजमा आणि तिसरे म्हणजे सैफ अली खान. तिचे हे उत्तर ऐकून उपस्थित सर्व जण जबरदस्त हसायला लागले. तेव्हा करिना म्हणाली की, यापेक्षा भारी उत्तर काहीच असू शकत नाही. उलट मला उत्तराबद्दल प्राईज मिळायला हवे.
https://www.instagram.com/p/CNje1oWJomM/?utm_source=ig_web_copy_link