इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातच त्यांचे नाते जुळले. आता करण आणि तेजस्वी रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकतंच त्यांनी दुबईत घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियाद्वारे ही माहिती त्यांनी चाहत्यांनी दिली आहे.
करण आणि तेजस्वी सोशल मीडियावर नेहमीच प्रचंड सक्रिय असतात. त्यांचा चाहता वर्गही फार मोठा आहे. वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनातील अनेक अपडेट ते सोशल मीडियाद्वारेच चाहत्यांना देत असतात. गोव्यातील घर खरेदीनंतर आता तेजस्वी – करणने दुबईत आलिशान घराची खरेदी केले आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत तिने दुबईतील त्यांच्या घराची झलक दाखविली आहे.
तेजस्वी आणि करणच्या दुबईतील घरातील हॉल अत्यंत प्रशस्त आहे. यासोबतच घरातील सजावटही भारी आहे. प्रशस्त बेडरुमसह किचनमध्ये मार्बल स्टोनचे काम आहे. यासोबतच घराच्या बाल्कनीत स्विमिंगपूलही आहे. तेजस्वीने शेअर केलेल्या दुबईतील या घराच्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
करण आणि तेजस्वीने अनेक मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘बिग बॉस हिंदी’च्या १५ व्या पर्वात या दोघांचाही सहभाग होता. तिथेच त्यांचं जुळलं आणि मग त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. नुकतंच तेजस्वीने ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात ती अभिनय बेर्डेसह मुख्य भूमिकेत होती.
karan kundra tejasswi Prakash Dubai Luxurious Home Video