मुंबई – भविष्याची चिंता प्रत्येकालाच सतावत असते. कोरोनाने तर साऱ्यांनाच विचार करायला भाग पाडले आहे. असाच प्रसंग पुन्हा आला तर भविष्यात आपले काय होईल, असा प्रश्न सतावणेही स्वाभाविक आहे. त्यामुळे निवृत्तीनतंरची सोय लावून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. अश्यात तुम्ही पंतप्रधान श्रम योगी मान-धन योजनेच्या माध्यमातून निवृत्तीनंतरही पेंशनची व्यवस्था तुम्ही करू शकता.
अशी आहे स्कीम
ही योजना स्वैच्छिक आहे. यात एक सर्वसाधारण गुंतवणुक करून असंघटिक क्षेत्रातील कामगार महिन्याला ३ हजार रुपये पेंशनचा लाभ घेऊ शकतात. पेंशन ६० वर्षे वयानंतरच मिळणार आहे. गुंतवणुक करणाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला अर्धी रक्कम पेंशन म्हणून मिळत राहील. त्यासाठी मासीक वेतन १५ हजार रुपयांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. तसेच या स्कीममध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील लोकच गुंतवणुक करू शकतात.
दरमहा एवढी गुंतवणुक
या स्कीममध्ये दरमहा ५५ ते २०० रुपयांपर्यंत गुंतवणुक केली जाऊ शकते. आधार कार्ड, बँक खाते अनिवार्य आहे. इंकम टॅक्स भरणाऱ्यांसाठी तसेच संघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना नाही, हे महत्त्वाचे.