मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शताब्दी स्तंभाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेच्या (CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सचिव तथा महानिदेशक डॉ.हिमांशु पाठक तसेच संस्थेचे पदाधिकारी, कृषी तज्ज्ञ, संशोधक व इतर मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय कापूस संशोधन तंत्रज्ञान संस्था ही कापूस उत्पादन आणि तंत्रज्ञानातील संशोधनात महत्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT) १९२४ मध्ये स्थापन झाली. ही संस्था कापूस क्षेत्रातील संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करते.