इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राकरिता कापसाची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने १९ ऑगस्ट २०२५ पासून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कापसावरील आयात शुल्क तात्पुरते माफ केले होते. निर्यातदारांना आणखी मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने कापसावरील (एचएस ५२०१) आयात शुल्क माफी ३० सप्टेंबर २०२५ पासून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल.