मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळेच या कुटुंबातील तब्बल ४ जण कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता अर्जुन कपूर याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अर्जुनची बहिण अंशुला कपूर ही सुद्धा कोरोना बाधित झाली आहे. प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची कन्या रिया कपूर आणि तिचे पती करण बुलानीला यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रिया यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून तशी माहिती दिली आहे. आम्ही दोघे घरातच विलगीकरणात असल्याचे तिने सांगितले आहे. रिया आणि करण यांचे नुकतेच लग्न झाले आहे. मुंबई महापालिकेने अर्जुन कपूरचे घर असलेल्या रहेजा ऑर्किड या बिल्डींगला सील केले आहे. या सर्वांनी नुकतेच नाताळ सेलिब्रेशन केले आहे. त्यामुळे हे सर्व जण एकमेकाच्या संपर्कात होते. तर, या सर्वांच्या संपर्कात आलेल्या इतरांचीही चाचणी करण्यात येणार आहे.