इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सैफ अली खान, हृतिक रोशन यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. जेवढे अपेक्षित होते, तेवढी कमाई बॉक्स ऑफिसवर झालेली नाही. नुकतेच या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. चित्रपटाकडून ज्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा ही आकडेवारी कमी आहे. त्यानंतर या चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी फिरते आहे. नुकतेच सैफ, हृतिक आणि राधिका ‘कपिल शर्मा शो’मध्ये आले होते. त्यावेळी नेहमीप्रमाणेच कपिलने सैफ आणि राधिका आपटे या दोघांची खिल्ली उडवली.
अभिनेता सैफ अली खान, हृतिक रोशन यांचा ‘विक्रम वेधा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. २०१७ मध्ये आलेल्या ‘विक्रम वेधा’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हा रिमेक आहे. हा चित्रपट मूळ चित्रपटापेक्षाही चांगला असल्याची प्रतिक्रियाही येत आहेत. हृतिक रोशनने साकारलेल्या वेधा या भूमिकेचं कौतुक होत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले आहे. नुकतेच या चित्रपटातील कलाकार कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रमोशनसाठी गेले होते. या कार्यक्रमात कपिल शर्माने प्रामुख्याने सैफ अली खान राधिका आपटे या दोघांची खिल्ली उडवली आहे.
या कार्यक्रमात कपिल शर्माने सैफ अली खानला अनेक मजेदार प्रश्न विचारले. कपिल म्हणतो, ‘तुझे या आधीचे चित्रपट बघितले ज्यात तू काही ना काही पकडतो आहेस. भूत पोलीस चित्रपटात तू भूतांना तर ‘बंटी बबली’ चित्रपटात खोट्या बंटी बबलीला पकडत होता. चित्रपटांमध्ये तर आम्हाला दिसते पण खऱ्या आयुष्यात जेव्हा तू तुझ्या फार्महाउसवर जातोस तिथे कोंबडी पकडण्यासाठी कोण ठेवले आहे’? या प्रश्नावर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, सैफने अजिबात वेळ न दवडता लगेच ‘मी एक कोंबडा ठेवला आहे’. असे उत्तर दिले. सैफच्या या उत्तरावर प्रेक्षक खुश झाले. त्यावरही कपिल विचारतो, ‘या चित्रपटातही कधी तू बंदूक पकडून आहेस तर कधी राधिकाला पकडून आहेस’, त्यावर सैफने उत्तर दिले की, ‘होय या चित्रपटात एक सीन आहे जिथे मी एका हातात बंदूक पकडली आहे तर दुसऱ्या हातात राधिकाला पकडले आहे.
या चित्रपटाने पहिल्या दिवशी १०.५० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट समीक्षकांनी चित्रपट चांगला असल्याचे म्हटले आहे. चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी देखील चित्रपटाला पसंती दिली आहे. ‘विक्रम वेधा’’ भारतात ४००० हून अधिक चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे, यात सैफ एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांची आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे.
Kapil Sharma Show Saif Ali Khan Radhika Apte Joke