इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – द कपिल शर्मा हा प्रसिद्ध टीव्ही शो मधील कॉमेडियन तीर्थानंद राव याने फेसबुक लाईव्हद्वारे आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. राव हा ज्युनियर आर्टिस्ट आहे. तीर्थानंद राव हा कपिल शर्मा शोमध्ये ज्युनियर नाना पाटेकर म्हणूनही ओळखले जातो. तीर्थानंद आधी सोशल मीडियावर लाइव्ह आला आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कलाकाराला तातडीने रुग्णालयात नेले.
द कपिल शर्मा शोमध्ये दिसलेले ज्युनियर आर्टिस्ट तीर्थानंद राव यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान फिनाईल पिण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर लाईव्ह येत असताना तीर्थानंद म्हणाले की, त्यांच्या या अवस्थेला एक महिला जबाबदार आहे. त्यांचे काही चुकले असेल तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. या महिलेला दोन मुली आहेत आणि तीर्थानंद तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.
तीर्थानंद यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी तो एका महिलेला भेटला. तिला दोन मुली आहेत. आम्ही लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होतो, पण आमच्या एकत्र राहण्याच्या काळात मला नंतर कळलं की ती वेश्या आहे. मला त्या महिलेची सुटका करायची होती, पण तिने माझ्यावर गुन्हा दाखल केला, मला धमकावले. यामुळे मी बरेच दिवस माझ्या घरी जाऊ शकलो नाही. मला फूटपाथवर झोपायला लावले आणि त्रास झाला, त्यामुळेच मी असे पाऊल उचलणार आहे.
तीर्थानंदच्या या व्हिडिओची माहिती मिळताच शांती नगर पोलिस स्टेशनचे पोलिस पथक त्यांच्या घरी पोहोचले, राव हा बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीर्थानंद यांच्यावर त्या महिलेमुळे ३ ते ४ लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले.
तीर्थानंद यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी एकदा असे पाऊल उचलले आहे. याआधीही २७ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आर्थिक विवंचनेमुळे तीर्थानंद यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले.
Kapil Sharma Show Artist Facebook Live Suicide Attempt