मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छोट्या पडद्यावरील म्हणजेच टीव्हीवरील काही मालिका आणि शो अत्यंत लोकप्रिय असतात. त्यामुळे या शोला अधिकच प्रेक्षकवर्ग लागतो. तसेच अनेक जण हा शो आवडीने बघतात. त्यापैकीच एक म्हणजे कपिल शर्मा शो होय, या शोमधील कलाकारांविषयी अनेकांना उत्सुकता असते हे कलाकार किती पैसे मिळतात याबद्दल देखील रसिकांना जाणून घ्यायचे असते आता त्याविषयी जाणून घेऊ या…
द कपिल शर्मा शो हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक असून यात चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दर आठवड्याला मोठमोठी स्टारकास्ट येत असतात. कपिलसोबत शोमध्ये दिसणारे बाकीचे कलाकारही तितकेच लोकप्रिय आहेत. आता हा शो इतका हिट झाला आहे की, कलाकारांची नेट वर्थ जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
कपिल शर्मा हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. कपिल त्याच्या शो व्यतिरिक्त अनेक मोठ्या जाहिराती करतो. याशिवाय तो अवॉर्ड फंक्शन्स आणि स्टेज शो होस्ट करत असतो. बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार कपिलच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती 245 कोटी रुपये आहे.
महिला विनोदी कलाकारांच्या यादीत भारती सिंग पहिल्या स्थानावर आहे. रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती 30 कोटी आहे.
कृष्णा अभिषेक हा कपिलच्या शोचा महत्त्वाचा भाग आहे. तो सपनाच्या पात्रात दिसत आहे. कृष्णाची एकूण संपत्ती 22 कोटी रुपये आहे.
शेकडो चित्रपटांमध्ये काम केलेल्या अर्चना पूरण सिंह या शोच्या जज आहेत. रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती 220 कोटी आहे.
शोचा आणखी एक लोकप्रिय चेहरा म्हणजे किकू शारदा. रिपोर्टनुसार किकूची एकूण संपत्ती 20 कोटी आहे.
सुमोना चक्रवर्ती सरलाची भूमिका साकारत आहे. त्यांची एकूण संपत्ती 28 कोटी असल्याचा अंदाज आहे.
कपिल शर्माचा मित्र चंदन प्रभाकर शोमध्ये त्याच्याच नावाने दिसतो. त्यांची एकूण संपत्ती 6 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.