गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कन्यादान योजनेच्या लाभासाठी अर्ज करतांना ही कागदपत्रे महत्त्वाची….

by India Darpan
मे 22, 2025 | 4:57 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 43

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कन्यादान योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे, त्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होणे हे प्रकार टाळण्यासाठी वरील प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना रूपये २५ हजार आणि सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे रूपये ४ हजार अनुदान कन्यादान योजनेंतर्गत देण्यात येते.

कन्यादान योजनेच्या लाभासाठी वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. नव दाम्पत्यातील वधू, वर यापैकी दोन्ही किंवा एकजण हे अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक असून वराचे वय २१ वर्षे व वधूचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असू नये. वधू व वर यांच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय आहे. तसेच सदर योजनेचा लाभ विधवा महिलेस दुसऱ्या विवाहासाठी अनुज्ञेय आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग दाम्पत्य अथवा त्यांचे कुटूंब यांच्याकडून झालेला नसावा. याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेले असावे.

सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी असे आहेत निकष
सामूहिक विवाह आयोजित करणारी सेवाभावी संस्था ही धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी. तसेच अर्ज सादर करतांना सदर नोंदणी प्रभावी असणे आवश्यक आहे. सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने विवाहात सहभागी होणाऱ्या वधू व वर यांची कागदपत्रे विवाह संपन्न होण्यापूर्वी ३० दिवस आगोदर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पूलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंत्री छगन भुजबळांचे नाशिक मध्ये युवक राष्ट्रवादीच्या वतीने जंगी स्वागत

Next Post

या व्यक्तींनी कामकाजाचा ताण कमी करावा, जाणून घ्या, शुक्रवार, २३ मेचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कामकाजाचा ताण कमी करावा, जाणून घ्या, शुक्रवार, २३ मेचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
Untitled 55

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर….यांना मिळाले पुरस्कार

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011