इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कानपूरमधील करौली बाबाच्या अनेकानेक सूरस कथा सध्या समोर येत आहेत. बाबाच्या आश्रमात भक्तांकडून करोडोंची उलाढाल केली जात असल्याचे उघड झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकुश आश्रमात रोजची करोडोंची कमाई जमा करण्यासाठी एक रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेत दररोज रुपये पाठवले जातात. दुसरीकडे रुग्णवाहिका परत आल्यावर भाजीपाला नेला जातो. देश-विश्वातून दररोज एक हजार ते तीन हजार भाविक आश्रमात पोहोचतात.
परदेशातही बाबाचे शेकडो भक्त आहेत. आश्रमात प्रवेश शुल्काच्या नावावर १०० रुपयांची स्लिप कापली जाते. प्रवेश शुल्कातूनच दररोज लाखो रुपये येतात. हवन किट्सच्या विक्रीत गुंतलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज सरासरी २५ हवन किट्स विकल्या जातात. त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये एवढी आहे. परिणामी, आश्रमात दररोज सरासरी ३० ते ४० लाख रुपये उत्पन्न मिळते. आश्रमाचे पैसे मोजण्यासाठी करौलीसह आसपासच्या गावातील सुमारे ५० तरुणांना दरमहा १० हजार रुपये पगारावर कामावर ठेवण्यात आले असून ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली मशीनच्या मदतीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत पैसे मोजतात.
हॉटेल आणि कॅन्टीन
बाबाने सुमारे १४ एकरमध्ये आश्रम पसरवला आहे. आवारात राहण्यासाठी सामान्य ते उच्च सुविधांनी सुसज्ज हॉटेल्स आहेत, ज्यांचे भाडे १ हजार ते अडीच हजार रुपये प्रतिदिन आहे. याशिवाय बँकेचे एटीएम, कॅन्टीन, आइस्क्रीम पार्लर, ट्रॅव्हल एजन्सी आदी सुविधा आवारातच उपलब्ध आहेत.
दीड महिन्यापूर्वी पैसे मोजत असताना गावातील एका तरुणाने २०० रुपये चोरल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून बाबाला ही घटना समजली, तेव्हा तरुणाला बाऊन्सरने बेदम मारहाण केली. याच्या निषेधार्थ गावातील २० तरुणांनी एकत्र काम सोडले होते. मात्र, बदनामीच्या भीतीने त्यांनी स्वत: पोलिसांत तक्रार केली नाही.
सुमारे वर्षभरापूर्वी दिल्लीहून एक पथक छापा टाकण्यासाठी आश्रमात पोहोचले होते. कोरोनामुळे आश्रमात लॉकडाऊन लागू होणार असल्याची अफवा पसरवून सर्व भाविकांना पाठ फिरवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वत: आश्रमात पोहोचून करौली बाबाला या छाप्याची माहिती दिली होती.
Kanpur Karauli Baba Luxurious Services in Ashram