नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कंझावाला परिसरात थर्टी फर्स्टच्या रात्री एका तरुणीला कारचालकाने बारा किलोमीटर फटफटत नेण्यात आले. त्यात तरुणीचा मृत्यू झाला होता. यामागे घातपाताचा संशय व्यक्त होत असतानाच आरोपीने भितीपोटी फटफटत नेल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
थर्टी फर्स्टच्या रात्री संबंधित तरुणीचा पार्टीदरम्यान मैत्रीणीसोबत वाद झाला होता. या वादानंतर दोघीही पार्टीच्या ठिकाणाहून निघून गेल्या. पण दुसऱ्या दिवशी थेट तरुणीचा अपघातात मृत्यू झाल्याचीच बातमी पुढे आली. ज्या कारचालकाने तिला बारा किलोमीटर फटफटत नेले, त्याने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. चौकशीदरम्यान, अपघाताच्या प्रकरणात अडकण्याच्या भितीने आपण तरुणीला बारा किलोमीटर फटफटत घेऊन गेलो, असे आरोपी अंकूश खन्ना याने पोलिसांना सांगितले आहे. यावेळी कारमध्ये अंकुश खन्ना याच्यासोबत त्याचे मित्रही होते.
सगळे थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी जात होते आणि मद्यधुंद होते. अंकुश खन्नाने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला कोर्टात उभे करण्यात आले. यावेळी त्याचा गुन्हा जामीनपात्र असल्याचे निरीक्षण नोंदवत २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, एका तरुणीचा आपल्या गाडीचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे कळल्यानंतरही गाडीतील एकालाही तिच्यावर दया आली नाही, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. त्यामुळे अजूनही अंकूश खन्ना व इतर मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी व कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
खून की अपघात?
अंजली सिंग नावाची दिल्लीतील तरुणी पार्टी करून येते असे सांगून थर्टी फर्स्टच्या रात्री घरातून बाहेर पडली. त्यानंतर थेट तिच्या मृत्यूचीच बातमी घरी आली. पार्टीमध्ये जो काही वाद झाला, त्यानंतर तिची मैत्रीण निधी हिच्यावरही शंका घेण्यात आली. कारण दोघीही एकाच गाडीने घरी गेल्या की वेगवेगळ्या गाडीने गेल्या याबाबत कुणालाच माहिती नव्हते. त्यामुळे धडक दिल्यानंतरही अंजलीला फरफटत नेणारे निर्दयी लोक कोण होते, असा सवाल उपस्थित होत होता.
Kanjhawala Case Suspected Police Detail Incidence
New Delhi Crime Anjali Dead Body Rash Driving Hit and Run