इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानच्या उदयपूरमध्ये नुपूर शर्माच्या पाठिंब्यामुळे हत्या झालेल्या कन्हैयालालच्या मृतदेहाचे सरकारी एमबी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. घरासमोर मोठा जनसमुदाय जमल्याने आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालातून हल्लेखोरांची क्रूरता समोर आली आहे.
शवविच्छेदन अहवालानुसार, नराधमांनी कन्हैयावर धारदार शस्त्रांनी तब्बल २६ वार केले होते. लालच्या शरीरावर तब्बल १३ खोल जखमा आढळल्या आहेत. यापैकी बहुतेक गळ्याभोवती आहेत. मान शरीरापासून वेगळी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात अहवालातून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, कन्हैयाचा मृतदेह घरी पोहोचताच कन्हैया अमर रहे, मारेकऱ्यांना फाशी द्या अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. खुनाच्या बदल्यात खुनाची मागणी नातेवाईकांनी केली आहे. रडत रडत कन्हैयाची बहिण म्हणाली, “ज्याप्रमाणे माझ्या भावाला मारले, त्याच प्रकारे दोषींना मारले पाहिजे.” जमावाने पोलिसांविरोधातही घोषणाबाजी केली.
नुपूर शर्मा हिच्या समर्थनार्थ पोस्ट टाकून दुखावल्यानंतर कट्टरवाद्यांनी कन्हैयालाल यांना धमकावून त्यांच्या हत्येची घोषणा केली होती, हे विशेष. मोहम्मद रियाझ आणि गौस मोहम्मद नावाच्या व्यक्तींनी मंगळवारी संध्याकाळी कन्हैयाची निर्घृण हत्या केली. हल्लेखोरांनी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैदही केली. दोन्ही आरोपींना राजसमंद येथे अटक करण्यात आली आहे.
उदयपुर की घटना में शामिल आरोपियों की त्वरित गिरफ्तारी करने वाले पांच पुलिसकर्मियों श्री तेजपाल, श्री नरेन्द्र, श्री शौकत, श्री विकास एवं श्री गौतम को आउट ऑफ टर्म प्रमोशन देने का फैसला किया है।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) June 29, 2022
Kanhaiya Lal Postmortem Report Cruelty Murder Udaipur Rajasthan