विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशद्रोह प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा मुद्दा उपस्थित करत पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाच्या पासपोर्ट नूतनीकरणावर आक्षेप नोंदवल्यानंतर कंगना रनौतने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, येथेही न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. पासपोर्टचा अवधी संपत असताना ऐनवेळी याचिका का दाखल केली? असा सवाल करत याचिका चुकीची दाखल केल्याचे म्हटले आहे. आता या याचिकेवर २५ जून रोजी सुनावणी होणार आहे.
‘धाकड’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी कंगनाला १५ जून ते ३० ऑगस्ट या काळात कंगनाला हंगेरीला रवाना होणार आहे. मात्र पासपोर्ट सप्टेंबर २०२१ पर्यंतच वैध असल्याने प्रवासात अडचणी येत असल्याचा दावा कंगनाने याचिकेत केला आहे. या याचिकेवर सुनावणीच्या वेळेत उच्च न्यायालयाने काही प्रश्न विचारले, त्याचबरोबर पासपोर्ट नुतनणीकरणाचे निर्णय पोलीस स्टेशन नाही तर पासपोर्ट घेत असते असेही उच्च सांगितले. यावेळी मात्र कंगनाला नव्याने सुधारित याचिका करण्याची मात्र मुभा देण्यात आली.