नाशिक – रिसा कम्युनिकेशन आयोजित डिजेल्स इव्हेण्ट मिस व मिसेस सौंदर्यवती स्पर्धेत शनिवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या ग्रँड फिनालेत देशभरातील विविध स्पर्धकांमध्ये मिसेस इंडिया वर्ल्ड २०२२ पुरस्काराने अंजूमताई सुहास कांदे यांना गौरवण्यात आले. महाराष्ट्र, कर्नाटका, आसाम, सिक्कीम,अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा या राज्यातून प्रत्येकी तीन स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. सामाजिक उपक्रम सामान्य ज्ञान, सांस्कृतिक योजना, व्यक्तिमत्त्व विकास या निकषांवरती अंजूमताई कांदे यांनी उत्तम गुण मिळवत खिताब मिळवला.आपली बौद्धिक क्षमता सामाजिक कार्य आणि भविष्यातील समाजहिताच्या विविध योजना या अतिशय आशावादी व्यक्तिमत्वाच्या जोरावर अंजुमताईंनी अंतिम फेरीत यशाचे शिखर गाठले.
उच्चशिक्षित अंजुमताई कांदे या सतत समाजसेवेत कार्यरत असतात, नांदगाव विधानसभा मतदारसंघातील युवती व महिलांच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम त्या राबवत असतात, देवाज हेल्थ अँड फाउंडेशन तसेच समता ब्लड बँकेच्या माध्यमातून आरोग्य सेवेतही त्यांचे मोठे योगदान आहे, एक उत्तम गृहिणी, माता, यशस्वी व्यवसायिक, तसेच सेवाभावी समाजसेविका या विविध भूमिका त्या जबाबदार पणे यशस्वीरीत्या सांभाळतांना अंजुमताईनी नव्या युगाची प्रेरणा घेत सौंदर्य स्पर्धेत भाग घेत,स्वतःला सिद्ध केले, ही उल्लेखनीय बाब आहे. सौंदर्य स्पर्धेत सारख्या नवीन क्षेत्रात भाग घेतांना अंजुमताई कांदे यांनी आपल्या संस्कृतीचे भान ठेवले, मराठमोळी नऊवारी साडी परिधान करत स्पर्धेत भाग घेतला ही एक उल्लेखनीय बाब आहे.
आपल्या मतदारसंघातील महिला व युवतींना आपली संस्कृती, संस्कार, घर संसार सांभाळत नव्या युगातही स्त्री आपले कर्तृत्व सिद्ध करु शकते,क्षेत्र कोणतेही असो स्त्री ते आवाहन स्विकारण्याची क्षमता ठेवते ही प्रेरणा त्यांनी दिली आहे. या यशस्वी विजयानंतर जुलै महिन्यात साऊथ कोरिया येथे होणाऱ्या मिसेस वर्ल्ड २०२२ स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याचा मान सौ अंजलीताई कांदे यांना मिळाला आहे. ही नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व माता भगिनीसाठी अतिशय आनंदाचा व अभिमानास्पद क्षण आहे याबद्दल नांदगाव विधानसभा मतदार संघ तसेच नाशिक जिल्ह्यातून सोशल मीडियावर अंजुमन ताई कांदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे