नाशिक – संपूर्ण महाराष्ट्रात रब्बी हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते नाशिक विभागात सर्वाधिक कांद्याची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्यासाठी रासायनिक खताची टंचाई जाणवत असून खरेदी विक्री संघ सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळत नसल्याने विविध कृषी सेवा केंद्रांमध्ये जाऊन शेतकरी रासायनिक खतांची खरेदी करत आहे परंतु कृत्रिम टंचाईच्या पार्श्वभूमीवर बहूतांशी कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना वाढीव दराने खतांची विक्री केली जात असून शेतकऱ्यांना जी खते घ्यायचे आहेत त्याच्यासोबत इतरही खतांचे किंवा औषधांची बळजबरीने खरेदी करण्याचा कृषी सेवा केंद्रांकडून आग्रह केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सहजासहजी रासायनिक खते उपलब्ध होत नाही किंवा मिळाली तरी विनाकारण जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात विभागीय अधीक्षक सुनील वानखेडे यांना पत्र देण्यात आले आहे. निवेदनाचा मजकूर खालील प्रमाणे आहे. नाशिक विभागात रब्बी हंगामातील कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली असून कांदा पिकास रासायनिक खतांचे डोस देणे गरजेचे आहे परंतु खरेदी विक्री संघ सोसायट्यांमध्ये खते उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खत टंचाईचा सामना करावा लागत आहे या कृत्रिम खते टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध कृषी सेवा केंद्र मालकांकडून शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची विक्री सुरू आहेत तसेच ज्या खतांची शेतकऱ्यांना गरज नाही तेही खते घेण्याची कृषी सेवा केंद्रा कडून बळजबरी केली जात असून संपूर्ण नाशिक विभागात कांदा उत्पादक शेतकरी या कृत्रिम खतांचा यामुळे त्रस्त झाले असून कृषी विभागाने तात्काळ मुबलक प्रमाणात व वाजवी दरात खतांचा पुरवठा होईल यासाठी पावले उचलावी तसेच सर्व खते विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची तात्काळ तपासणी करून खतांचा साठा तपासावा व वाढीव दराने होणारे खत विक्री व बळजबरीने इतर खते औषधे घेण्याची सक्ती शेतकऱ्यांना करु नये असे लेखी आदेश काढावेत व शेतकऱ्यांना सहजासहजी रासायनिक खतांची उपलब्धता व्हावी यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी विभागीय कृषी कार्यालयात घेराव घालतील याची शासनाने नोंद घ्यावी निवेदनावर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, अतुल गिते, दत्तात्रय सांगळे, प्रल्हाद सांगळे, सिताराम आव्हाड, सुभाष सांगळे, चंद्रभान आव्हाड, सतीश आव्हाड, प्रकाश शेळके, भाऊसाहेब आगिवाले आदि शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.