सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याचे भाव कोसळल्यामुळे तालुक्यातील करंजाड येथे आज शेतक-यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले. कांदा मातीमोल भावात विकत असल्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे सांगत बागलाण तालुका शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले. या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करुन संताप व्यक्त करण्यात आला. सोमवारी सकाळी ९.३० वाजता हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. भीक नको, हवे आम्हाला घामाचे दाम अशा घोषणांनी परिसर शेतक-यांनी दणाणून सोडला.