अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गेल्या काही महिन्यापासून कांद्याला भाव नसल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी असून कांद्याला सध्या मिळणाऱ्या बाजारभाव पाहता उत्पादनासाठी येणारा खर्च सुद्धा वसूल होत नसल्याने कांद्याला ३ हजार रुपये हमी भाव मिळावा व मागील तीन महिन्यात झालेल्या कांदा विक्रीचे ७०० रुपये अनुदान मिळावे अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही काळ लिलाव बंद ठेवत बाजार समिती समोरील चांदवड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या या आंदोलनामुळे मनमाड-चांदवड रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.