चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याचे भाव कमी झाल्याने व कांद्याला भाव मिळत नसल्याने संतप्त होत शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ठीया आंदोलन करत महामार्ग रोखला. यंदा कांद्याचे उत्पादन चांगले झाले असून चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असताना बाजारभावात कांद्याची सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव द्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्वरीत भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. अल्प दराने विक्री केलेल्या कांद्यास शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान द्या या मागण्या करण्यात आल्या. अन्यथा जेलभरो आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी संतप्त होत चांदवड बाजार समितीचा लिलाव देखील बंद पाडला आहे.