अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेच्या वतीने येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादन व व्यापार परिषद आयोजित करण्यात आली होती. कांद्याच्या भावात सतत घसरण होत आहे तसेच कांद्याचे भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांवर इनकम टॅक्स व ईडीच्या धाडी घातल्या जाऊन कांद्याचे भाव कसे कमी होईल हे करण्याचे काम सध्या होत आहे. ईडी व इनकम टॅक्सचे लोक त्रास देत असेल तर त्यांना वटणीवर आणण्याचे काम करणार असून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने कांद्याचा भाव पडणार असेल तर नाफेडचा कांदा बाजारात येऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे देविदास पवार यांनी दिली. यावेळी या कांदा परिषदेत ७ ठराव मंजूर करण्यात आले.या कांदा परिषदेस मा. आ. वामनराव चटप ,मा. आ. सरोज ताई काशीकर,गोविंदराव जोशी,रामचंद्र बापू पाटील,अनिल घनवट,प्रज्ञाताई बापट, देविदास पवार, शशिकांत भदाणे, सिमाताई नरोडे, राम बांदकर, संतू पा झाम्बरे, बापूसो पगारे आदी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.