अजय सोनवणे, मनमाड
नाशिकच्या निफाड तालूक्यातील रुई येथे तब्बल ३९ वर्षा नंतर भव्य कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १९८२ साली स्व.शरद जोशी यांनी येथूनच कांदा आंदोलनाच रणशिंग फुंकले होते. ३९ वर्ष होऊनही कांदा उत्पादक शेतक-यांचा प्रश्न सुटलेला नसून रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ही कांदा परिषद होत आहे. यात कांद्याला हमी भाव मिळावा, नाफेड कडून खरेदी केलेल्या कांद्याला दर वाढवून मिळावे, राज्य सरकारने ३ रुपये किलो प्रमाणे अनुदान द्यावे अशा विविध मागण्या या परिषदेत मांडण्यात येणार असून परिषदे साठी भाजपाचे अन्य मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती रयतक्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिपक पगार यांनी दिली.