सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी चक्क कांद्या पासून श्रीगणेशाची प्रतिकृती बनवली आहे. या मुर्ती समोर त्याने कांद्याचा देखावा सुध्दा केला आहे. कांदा प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी त्याने ही मुर्ती तयार केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटत नाही.कोरडा दुष्काळ. ओला दुष्काळ. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज कांद्यापासून तयार केलेल्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना केल्याचे साठे यांनी सांगितले. सध्या कांदा पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात जात आहे. गेल्या चार पाच वर्षापासून कोरोनाच्या काळात फार मोठा तोटा झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा असल्याचेही ते म्हणाले.