नवी दिल्ली, (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ५२३.८ दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीच्या कांद्याची निर्यात करण्यात आली. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर कोणतेही निर्बंध किंवा बंदी घातलेली नाही. कांद्याचे सध्याचे निर्यात धोरण ‘मुक्त’ आहे. केवळ कांदा बियाणांची निर्यात ‘प्रतिबंधित’ आहे. विदेशी व्यापार महासंचालकांच्या अधिकृत परवानगीनुसार हा प्रतिबंध घालण्यात आला आहे.
विदेशी व्यापार महासंचालकांच्या द्वारे अधिसूचना क्रमांक ५० दि. २८.१२.२०२० नुसार सुधारित कांद्याचे (सर्व जातींचे) कापलेले, भाग केलेले किंवा पावडर स्वरूपात, तसेच बंगलोर गुलाब कांदे आणि कृष्णपुरम कांदे वगळून पावडर स्वरूपात, कापलेले, चिरलेले किंवा पावडर स्वरुपातील कांदे ‘प्रतिबंधीत” श्रेणीतून ‘मुक्त’ श्रेणीत समाविष्ट केले आहेत.