इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कांद्याच्या भावावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील समिती कक्ष ५ मध्ये महत्त्वपूर्ण बैठक कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्यास जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी उपाययोजना कराव्यात अशी सूचना पणन विभागाकडे केली.
या बैठकीत कांदा दर, कांदा आयात- निर्यात धोरण, कांदा लागवड कालावधी याविषयी सविस्तर चर्चा झाली. त्यासोबतच बाजार भाव वाढावे, शेतकऱ्यांना योग्य दर कसे देता येईल व अतिवृष्टीमुळे कांदा शेतीचे झालेले नुकसान यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीत पणन मंत्री जयकुमार रावळ यांच्यासह कृषी तसेच पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.