इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहेत. केंद्र सरकाराच्या या बजेटमध्ये नेमकं काय असणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. या बजेट सत्रात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यानी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल. नवीन कायदा आयकर कायदा १९६१ ची जागा घेईल. आता नवीन करप्रणातील १२ लाखापर्यंत आयकर लागणार नाही. त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पात गंभीर आजारावरील ३६ औषधे ड्युटी फ्रि केली आहे. पण, या अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतक-यांची निराशा केल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते आहे आणि उत्पादन खर्च कमी होतो आहे असे सांगितले जे पुर्णपणे विसंगत आहे आजच्या अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीही दिलासा मिळाला नाही कांदा निर्यातीवरील बंदीसह इतर निर्बंधांमुळे कांदा दर घसरून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या वार्षिक नुकसानीची भरपाई म्हणून दरातील फरक देण्यासाठी स्वतंत्र कांदानिधी मंजूर करण्याची आवश्यकता होती सरकारकडून शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव ठरवून पाडले जातात परंतु दर घसरणीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकारकडून भरपाई किंवा दरातील फरक मिळत नाही आजचा अर्थसंकल्प कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराजनकच म्हणावा लागेल.