कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कळवण मर्चंट बँकेचे चेअरमन आणि प्रसिद्ध कांदा व्यापारी सुनिल पांडुरंग महाजन (वय ५१) यांचे आज पहाटे निधन झाले. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे ४.४५ वा. त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे उपचार सुरू करण्यात आले. पण, या प्रयत्नांना फारसे यश आले नाही.
कळवण येथील त्यांच्या राहत्या घरापासून आज (गुरुवार, ३० जून) दुपारी ४ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. तर, पार्थिवावर गिरणा संगम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा कल्पेश, पत्नी अनिता, मुलगी पुजा, ज्येष्ठ बंधू योगेश, वहिनी, पुतणे असा असा परिवार आहे.
कळवण परिसरासह ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्यांच्या व्यवसायाचा मोठा पगडा होता. सुप्रसिद्ध उद्योजक, कांदा व्यापारी, बेटावद येथील कुलस्वामिनी जोगेश्वरी माता ट्रस्टचे अध्यक्ष, एस एम ग्रुपचे संचालक अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले. अतिशय उत्साही, होतकरु आणि उत्कृष्ट नेतृत्व करणाऱ्या महाजन यांच्या निधनाने सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त होत आहे.
Kamco Chairman Onion Trader Sunil Mahajan passed away Kalwan