नवी दिल्ली – या वर्षाच्या आरंभी जगातील महसत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन यांनी सूत्रे हाती घेतली तर उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस या मूळ भारतीय वंशाच्या महिलेची निवड करण्यात आली याचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर गेल्या दहा महिन्यात जगभरात अनेक घडामोडी राजकीय घडल्या. आता जगभरातील भारवंशीय आणि भारतवासियांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ती म्हणजे, कमला हॅरीस यांच्याकडे अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहेत.
कोरोना महामारीच्या काळात जो बाईडन यांच्या निर्णयाबद्दल अनेक उलट सुलट प्रतिक्रिया अद्यापही उठत असताना कमला हॅरीस यांच्याविषयी सर्वांच्याच अपेक्षा वाढलेल्या होत्या. परंतु त्या पूर्ण न झाल्याने त्यांच्याविषयी काही प्रमाणात अमेरिकन जनतेमध्ये नाराजी दिसून येत होती. परंतु याच पार्श्वभूमीवर आता प्रभारी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा कमला हॅरीस यांच्याकडे सोपविण्यात आल्याने पुन्हा एकदा जागतिक राजकारणात या घटनेची नोंद घेतल्या गेली असून यासंदर्भात काय प्रतिक्रिया उमटते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
येत्या काही दिवसांसाठी जो बायडेन यांनी आपले सर्व अधिकार उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवत आहेत. कारण जो बायडन कॉलोनोस्कोपीसाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यामुळे आपल्या पदाचे अधिकार काही काळासाठी ते उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे दिले आहेत.
व्हाइट हाऊसच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, जो बायडन प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यांची कॉलोनोस्कोपी करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना अॅनेस्थिसिया देण्यात येणार आहे. त्याच्या प्रभावातून बाहेर येण्यास त्यांना काही काळ लागेल. त्यामुळे ते पूर्णपणे अनेस्थिसियाच्या प्रभावातून बाहेर येईपर्यंत राष्ट्राध्यक्ष पदाच्या सर्व जबाबदाऱ्या कमला हॅरिस सांभाळणार आहेत.
काही दिवसांपूर्वी महत्वाच्या निर्णयावरून राष्ट्रपती बायडन आणि कमला हॅरिस यांच्यात काही मतभेद झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच कमला हॅरिस यांच्यावर अमेरिकेतील जनता नाराज आहेत. तसेच गेल्या महिन्यात जो बायडन यांच्या तुलनेत कमला हॅरिस यांचे अप्रूवल रेटिंगही कमी आहे, अशा चर्चाही होत होत्या.
अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपद भूषवणारे बायडेन हे सर्वात वयस्कर व्यक्ती असून नुकताच बायडन त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला आहेत. मात्र यावर्षी जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच संपूर्ण आरोग्य तपासणी होणार आहे. त्यामुळे अमेरिकेत राष्ट्रपतींना वैद्यकीय प्रक्रियेतून जात असताना दिर्घ रजेवर जावे लागले तर उपराष्ट्रपतींकडे अध्यक्षीय अधिकार सोपवण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येते. जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या अध्यक्षतेच्या काळात तत्कालीन उपराष्ट्रपती डिक चेनी यांना अनेक वेळा राष्ट्रपतीपद भूषवावे लागले होते. अमेरिकन राज्यघटनेतील नियमानुसार अध्यक्षीय अधिकार हस्तांतरित करण्याचा विशेषाधिकार देण्यात आला आहे.