कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एका भुरट्या चोराने मोबाईल चोरला आणि तो घरी लपवून ठेवला. पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर त्याने कबुली दिली. मग पोलीस मोबाईल घ्यायला त्याच्या घरी गेले तर असे काही घडले की पोलिसांनाच धक्का बसला.
कल्याण रेल्वे स्थानकावर एकाचा मोबाईल चोरी गेला. प्रवाश्याने जीआरपीकडे तक्रार दाखल केली. काहीच तासांमध्ये पोलिसांनी चोराला पकडले आणि त्याच्याकडून कबुली घेतली. कबुली देताना त्याने मोबाईलचे लोकेशन सांगितले. आपण चोरलेला मोबाईल घरी लपवून ठेवला असल्याचे सांगितले. जीआरपीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी महिला पोलिसांचे पथक चोराच्या वस्तीत पाठवले. महिला पोलिसांनी चोराचे घर शोधले आणि घरात प्रवेश केला. तर तिथे असलेल्या तीन महिलांनी त्यांच्यावरच आरडाओरड सुरू केली. एवढेच नव्हे तर ओरडताना त्या तिघीही विवस्त्र झाल्या आणि जोरजोराने ओरडायला लागल्या. त्यामुळे पोलीसच घाबरून गेले. पण तरीही त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. आणि अखेर पोलिस असे काही वरचढ झाले की थोड्याच वेळात त्या विवस्त्र महिलांनीच अंगावर कपडे घेत पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आणि संबंधित प्रवाश्याला तो सुपूर्द केला. त्यामुळे चोर सापडला आणि मोबाईलही सापडला असला तरीही काही वेळासाठी पोलिसांना मात्र घाम फुटला होता.
गर्दी झाली म्हणून…
महिला पोलिसांच्या पथकापुढे तीन महिला विवस्त्र झाल्या. त्यामुळे धक्का बसला असला तरीही परिस्थिती नियंत्रणात आणणे पोलिसांना अशक्य नव्हते. पण गोंधळ झाल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. आणि ही गर्दी झाली म्हणूनच त्या तीन महिलांना पळ काढता आला. अन्यथा महिला पोलिसांनी त्यांना बदडले असते हे नक्की.
पोलीस म्हणाला ‘आय लव्ह यू’
काही दिवसांपूर्वी एका निलंबित पोलीस उपनिरीक्षकाने महिलेची छेड काढली आणि तिला आय लव्ह यू म्हटले. त्यामुळे जमावाने त्याला चांगलेच चोपले. हा निलंबित पोलीस उपनिरीक्षक मद्यधुंद अवस्थेत शिविगाळ करत होता. त्याने महिलेचा हातही धरला. त्यामुळे जमावाने त्याला बेदम मारले. छत्रपती संभाजीनगर शहरात ही घटना घडली होती.
Kalyan Police Crime Theft Women’s Cloth