इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कल्याणमध्ये खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर मनसेने तीव्र निषेध करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर आरोपी गोपाळ झा याला मनसेच्या पदाधिका-यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासह चार जणांना अटक केली.
आरोपी गोकुळचा भाऊ रणजीत झा सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतले. मारहाण करणारा हा रेकॅार्डवरील आरोपी असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर ३ गंभीर गुन्हे दाखल आहे. कोळसेवाडी, विठ्ठलवाडी आणि मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये याची नोंद आहे. मारहाण करणं, हत्यार वापरणं असे गंभीर गु्न्हे गोकुळ झा याने केले आहे. आता आरोपीच्या घरच्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काल मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेऊन बदला घेण्याचा इशारा दिला. याबाबत बोलताना जाधव यांनी म्हटले की. मुलीची परिस्थिती वाईट आहे. त्या मुलीला लाखा बुक्क्याने भरपूर मारले आहे. २४ तास ती त्याच दुःखात घरी बसून होती. पोलिसांना विनंती याला लवकरात लवकर अटक करावी. नाहीतर तो आमच्या हाताला लागला तर आम्ही देखील त्याने त्या मुलीवर हात उचलला तसा हाताचा वापर करु असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली. पण, मनसेच्या पदाधिका-यांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.