शनिवार, ऑगस्ट 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भर पावसात ४ महिन्यांचे बाळ नक्की कसे पडले? आजोबांनी सांगितला अंगावर काटा आणणारा तो अनुभव

by Gautam Sancheti
जुलै 22, 2023 | 6:42 pm
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो



ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईसह परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहेत. त्यात काही दुर्घटनाही घडत आहेत. ठाकुर्लीजवळ एक दुर्घटना घडली जी देशभरातच चर्चेत आहे. भर पावसात रेल्वे रूळावरून जाताना अवघ्या चार महिन्यांचे बाळ आजोबांच्या हातून निसटले आणि नाल्यात पडले. या घटनेने सर्वांचे हृदय हेलावले. याबद्दल सर्वस्तरातून हळहळ व्यक्त होत आहे, परंतु ही घटना नेमकी कशी घडली याची हृदयद्रावक कहाणी त्या आजोबांनीच कथन केली आहे. हे ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील…

रेनकोट, नाला आणि पाऊस…
या हृदयद्रावक घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, योगिता शंकर रुमाल या बाळंतपणासाठी हैदराबाद येथून आपल्या माहेरी भिवंडीत आल्या होत्या. त्यांच्या रिषिका रुमाल (४ महिने) या बालिकेवर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या नियमित तपासणीसाठी योगिता आपले वडील ज्ञानेश्वर पोंगुल यांच्या सोबत मुंबईला गेली होती. जाताना ते गाडीने गेले होते, स्टेशनवर दुपारी गर्दी नसल्याने मुंबईहून अंबरनाथ लोकलने ठाकुर्लीपर्यंत आले. कल्याण स्थानकात उतरून त्यांना भिवंडीला जायचे होते. मात्र, मुसळधार पावसाने रेल्वे सेवा बंद झाल्याने योगिता, वडील ज्ञानेश्वर हे चिमुकल्या रिषिकाला घेऊन रेल्वेमार्गातून चालत निघाले होते. परत येताना पावसाने रेल्वेसेवेला फटका बसल्याने त्यांनी रेल्वे मार्गावर उतरून असा प्रवास सुरू केला होता. पावसापासून नातीचे संरक्षण व्हावे म्हणून आजोबांनी तिला रेनकोटमध्ये घेतले होते. मात्र, अचानक त्यातून ती निसटली आणि नाल्यात पडली.

शोध सुरूच
मुसळधार पावसात चालत असताना रेनकोट मध्ये बाळ झाकलेले होते. परंतु चालण्याच्या नादात रेल्वे रुळावरून जाताना नेमकी दुर्घटना घडली. याबाबत ज्ञानेश्वर पोंगुल यांनी त्या दिवशी नेमके काय घडले? याची आपबिती कहाणी सांगितली, दोन-तीन तास लोकल रेल्वे ट्रॅकवर थांबली होती. सर्वजण खाली उतरून जात होते. आम्ही पण लोकलमधून खाली उतरून जाण्याचे ठरवले. ट्रॅकवर चालत असताना माध्येच माझ्या मुलीचा पाय घसरला आणि त्यानंतर मी तिला सावरले. माझ्या नातीला मी रेनकोटमध्ये गुंडाळून माझ्या हातात घेतले होते. मात्र माझाही पाय घसरला आणि माझ्या हातात असलेली माझी नात रेनकोटमधून कधी नाल्यात पडली. मला समजलेच नाही. बाळ रेनकोटमध्ये नसल्याचे आमच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत माझी नात नाल्यात वाहून गेली होती, असे ज्ञानेश्वर यांनी सांगितले. सुमारे चार महिन्यांची ही बालिका असून तिचे नाव रिषिका ठेवण्यात आले होते. ठाकुर्ली कल्याण मार्गावर रुळाखालील नाल्यात पडून रिषिका या लहान बाळाचा शोध तिसऱ्या दिवशीही तपास यंत्रणेला लागला नाही. एनडीआरएफने तपास थांबवला होता. स्थानिक अग्निशमन यंत्रणा आणि लोहमार्ग पोलिसांनी मात्र तिचा शोध सुरूच ठेवला आहे. मात्र या प्रकरणांनी सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मी पाकिस्तानात जाणार नाही, असे सीमा हैदर का म्हणते आहे?

Next Post

जलज शर्मा यांनी स्वीकारला नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

घरच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे शासनाच्या या पोर्टलवर अपलोड करा…सांस्कृतिक मंत्र्याचे आवाहन

ऑगस्ट 30, 2025
540741271 1326862786112755 305345827109706478 n e1756518596652
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंची आ. सुरेश धस यांनी घेतली भेट…दिली ही महत्त्वाची माहिती

ऑगस्ट 30, 2025
सावनेर येथील दुय्यम निबंधक श्रेणी 1 या कार्यालयाला अचानक भेट 2 1024x682 1
संमिश्र वार्ता

महसूल मंत्री उद्विग्न, या कार्यालयात आला वाईट अनुभव…दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश

ऑगस्ट 30, 2025
Untitled 47
महत्त्वाच्या बातम्या

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको…नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांची वेगळी भूमिका

ऑगस्ट 30, 2025
Untitled 46
मुख्य बातमी

पंतप्रधानांच्या जपान दौ-यात झाले हे सामंज्यस करार….हा होणार दोन्ही देशांना फायदा

ऑगस्ट 30, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक खर्चावर लगाम घालावा, जाणून घ्या, शनिवार, ३० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरात शिरून चोरट्यांनी सव्वा सात लाख रूपयाचे दागिने चोरून नेले

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250829 WA0472 1
संमिश्र वार्ता

राष्ट्रीय क्रीडा दिन…राज्यातील या खेळाडूंना दिले २२ कोटीचे रोख बक्षिसं

ऑगस्ट 29, 2025
Next Post
jalaj sharma

जलज शर्मा यांनी स्वीकारला नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011