नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कळवण-सुरगाणा तालुक्यात लवकरच दोन नवी धरणे होणार आहेत. जामशेत व ओतूर ही ती दोन धरणे आहेत. या दोन्ही धरणांचा प्रस्ताव लवकरच शासनास सादर केला जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नुकताच आढावा घेतला आहे.
या धरणाच्या कामामुळे जामशेत, अंबुर्डी, अंबूर्डी खुर्द व नजीकच्या गावांना लाभ होणार आहे. शंभर टक्के आदिवासी भागातील साधारण २२७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे सुधारित शासन निकषांचा व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून सुधारित प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात येणार आहे.
ओतूर धरणातून होणारी गळती थांबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या नवीन पद्धतीच्या तंत्रज्ञान असलेल्या उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. या प्रस्तावास आवश्यक सर्व मान्यता घेवून राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्या मान्यतेने परिपूर्ण प्रस्ताव लवकरात लवकर शासनास सादर करण्यात येणार आहे.
Kalwan Surgana Two New Dams Trible Area
Nashik District