कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सुळे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले असून या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने रवळजी, धाकलदर शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात कंबरे एवढे पाणी जात असल्याने शेतक-यांच्या पिकांचे मोठ नुकसान होत आहे.
पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या आराखड्यामुळे कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागल्याचा आरोप शेतक-यांनी केला. शिवाय हजारो लिटर पाण्याची नासाडी त्यामुळे होत आहे.