कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील कळवण जवळील लिंगामा गावातील एका विहीरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. माधुरी मोरे व गीतांजली उखंडे असे मयत मुलींचे नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून स्थानिकांच्या मदतीने दोघा मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. या घटनेबाबत पोलिस तपास करत असून यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आले नाही.