अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरासाठी प्रस्तावित २५ कोटी रुपयांच्या चणकापूर धरण थेट पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला गिराणा काठ बचाव समिती व मार्क्सवादी पक्षाने विरोध केला आहे. गिरणा काठच्या सुमारे १७ गावांचा शेती सिंचन गिरणा नदी पात्रावर अवलंबून आहे. त्यामुळे जलवाहिनीद्वारे पाणी नेण्यास या गावांनी विरोध दर्शवीला आहे. लोकप्रतिनिधींनी दिलेला शब्दही पाळला नाही. आता या योजनेसाठी पाईप येऊन पडल्याने ग्रामास्थामध्ये रोष असून काम तात्काळ बंद करावे व नदीद्वारे पाणी आणावे अशी मागणी आता गिरणा काठचे शेतकरी करीत आहे.