कळवण – बगडु येथील बगळेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या सभापतीपदी सौ. साधना आहेर तर उपसभापतीपदी बारकू सूर्यवंशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के.डी. गायकवाड व सहकार अधिकारी सतीश पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. बगळेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या सभापतीपदासाठी सौं साधना आहेर तर उपसभापतीपदासाठी बारकू सूर्यवंशी यांचे निर्धारित वेळेत एकमेव नामनिर्दशनपत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेला नवनिर्वाचित संचालक राजेंद्र आहेर, बापू देवरे,जगन्नाथ आहेर, रामदास चव्हाण,दोधा पवार, सौं मीनाबाई वाघ,नितीन चव्हाण, मोहन पाटील,दिलीप वाघ, सुरेश वाघ आदी संचालक उपस्थित होते.
निवडीप्रसंगी बळीराम पाटील, नानाजी चव्हाण,सुरेश देवरे, पोपट आहेर, तुकाराम आहेर, भालचंद्र पाटील, कळवण बाजार समितीचे उपसचिव रविंद्र आहेर,मच्छिन्द्र पाटील,दादा देवरे, नथू आहेर,विठोबा आहेर, मोठाभाऊ वाघ, कैलास चव्हाण,संदीप आहेर, सतीश आहेर,गुलाब आहेर, रावण आहेर,रामकृष्ण आहेर, काकाजी आहेर,कारभारी आहेर, खंडू आहेर,बापू देवरे, बापू वाघ,बालू आहेर, गणेश चव्हाण,सागर आहेर, राजेंद्र सूर्यवंशी,अरुण चव्हाण आदी उपस्थित होते.