कळवण – कळवण नगरपंचायतच्या स्थायी समीतीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष कौतिक पगा, नियोजन आणि ,विकास सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपनगराध्यक्षा सौं हर्षाली पगार, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी काँग्रेसच्या नगरसेविका सौं रत्नाताई पगार तर पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राहुल पगार, स्वच्छता विषयक ,वैद्यकीय आणि आरोग्य सभापतीपदी काँग्रेसचे नगरसेवक मयूर बहिरम, महिला व बालकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सौ. लताताई निकम यांची आज विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. .
नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या आदेशान्वये आज नगरपंचायतच्या नगरसेवकांची विशेष सभा तहसिलदार बी. ए. कापसे यांच्या अध्यक्षतेखाली व कळवण नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचीन पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येऊन त्यात कळवण नगरपंचायतीच्या स्थायीसह सहा समितीच्या सभापतीची निवड करण्यात आली. कळवण नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा राष्ट्रवादीच्या सौं हर्षाली पगार ह्या नियोजन आणि विकास समितीच्या पदसिद्ध सभापती असून सदस्य म्हणून सौ.जोत्स्ना जाधव, मोतीराम पवार, सौ.ताराबाई आंबेकर,चेतन मैंद यांची निवड करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी काँग्रेसच्या नगरसेविका सौ.रत्नाताई पगार यांची तर सदस्य म्हणून बाळू जाधव, तेजस पगार ,मोतीराम पवार, सौ . जोत्स्ना जाधव यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा आणि जलनि:सारण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राहुल पगार यांची तर सदस्य म्हणून बाळु जाधव, गौरव पगार, ताराबाई आंबेकर, तेजस पगार यांची निवड करण्यात आली. स्वच्छताविषयक , वैद्यकीय आणि आरोग्य समिती सभापतीपदी काँग्रेसचे मयूर बहिरम तर सदस्य म्हणून सौ . रोहिणी महाले ,गौरव पगार, चेतन मैद, मोतीराम पवार यांची निवड करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ.लता निकम तर सदस्य म्हणून सौं रोहिणी महाले, सौ.सुनिता पगार, सौ. भारती पगार, सौ. भाग्यश्री शिरोडे यांची निवड करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या कार्यालयात आयोजित विशेष सभेला नगराध्यक्ष कौतिक पगार, उपनगराध्यक्षा सौ. हर्षाली पगार यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
स्थायी समीतीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष कौतिक पगार —
कळवण नगरपंचायतची स्थायी समीती गठीत करण्यात आली असून नगराध्यक्ष पदसिध्द सभापती असल्याने कौतिक पगार हे सभापती असून सदस्य म्हणून कळवण नगरपंचायतच्या नियोजन, विकास सभापती तथा उपनगराध्यक्षा सौं हर्षाली पगार, सार्वजनिक बांधकाम सभापती सौं रत्नाताई पगार तर पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती राहुल पगार स्वच्छता विषयक ,वैद्यकीय आणि आरोग्य सभापती मयूर बहिरम , महिला व बालकल्याण सभापती सौ. लता निकम यांची आज निवड करण्यात आली.