कळवण – कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहनदरी येथील एका मुख्याध्यापकानेच लाखो रुपयाचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कळवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक असताना संशयित गोकुळ चव्हाण यांनी हा अपहार केल्याचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांनी तक्रारीत म्हटले आहे. चव्हाण हे शाळेत प्रभारी मुख्याध्यापक असताना त्यांनी विदयार्थी लाभाची सुवर्ण महोत्सवी योजनेचे १ लाख ९६ रुपयांची रक्कम, शालेय पोषण आहाराची २७ हजारांची रक्कम, समग्र शिक्षा अभियान योजनेची २० हजार रुपयांची रक्कम अशी एकूण २ लाख ४३ हजारांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान ऑक्टोबर २० पासून ते सप्टेंबर २१ हा अपहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.