नाशिक – जिल्हा बँकेने २४० जप्त केलेल्या वाहन, ट्रॅक्टरचा टप्याटप्यात जाहीर लिलाव सुरु असून आज कळवण तालुक्यात जप्त केलेल्या २० ट्रॅक्टर जाहीर लिलाव करण्यात आला. तीन थकबाकीदारांनी त्याच्याकडील थकबाकीचा भरणा केल्याने सभासदांना ट्रॅक्टर परत देण्यात आले. लिलावापोटी रक्कम बँकेस ९३ लाख ६ हजार प्राप्त झाले.
लिलाव करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे मालक हे बँकेचे १० ते १५ वर्षापूर्वीचे थकबाकीदार आहेत. बँकेने वारंवार कर्ज मागणी नोटीसा देऊनही व सौजन्याने तगादे करूनही थकीत कर्ज रक्कमेचा बँकेकडे भरणा केला नसल्यामुळे सदरची कार्यवाही केल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले. सदर लिलावा प्रसंगी बँकेचे प्रशासक कदम, सरव्यवस्थापक नितीन ओस्तवाल, वसुली अधिकरी प्रदीप (रमेश ) शेवाळे, विभागीय अधिकारी माणिक आहेर, कळवण तालुका पालक अधिकारी दिलीप पगार, विशेष वसुली अधिकारी हेमंत भामरे, रवींद्र पगार, अरुण थेटे, मिलिंद पगारे तसेच विका संस्थेचे सचिव हे उपस्थितीत होते.