आमदार नितीन पवार यांनी दिली माहिती
कळवण – प्रत्येक गावासाठी पाणी पुरवठा योजना व प्रत्येक घरी नळ या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत कळवण व सुरगाणा तालुक्यातील ६५ कोटी रुपये किमतीच्या ७० गावांच्या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून निधीची तरतूद झाल्यामुळे या ७० गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे अशी माहीती कळवण – सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांनी दिली.आधीच्या पाणीपुरवठा योजनांमधील सर्व त्रुटी दूर करून शासनाने जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला घरपोच पाणी देण्याचे नियोजन केले आहे. याअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आधीच्या योजना या दरडोई ४० लिटर पाण्याच्या निकषावर आखण्यात आल्या होत्या. तर जलजीवन मिशन ही ५५ लिटर दरडोई या निकषावर अमलात आली आहे.
कळवण तालुक्यातील अभोणा ( ३ कोटी ४३ लाख ) कनाशी ( ३ कोटी ) खडकी (६१ लाख ), कुमसाडी (५८ लाख ) शेपूपाडा (५१ लाख ७१ हजार ) कोसवण (१ कोटी ५७ लाख )जामले वणी (७७ लाख ) जुनीबेज ( १ कोटी २६ लाख ) साकोरे ( ९३ लाख ) तिऱ्हळ (४१ लाख ) वडगाव, निमपाडा (९४ लाख )सुकापूर ( ७८ लाख) भेंडी (१ कोटी ८२ लाख ) दरेभणगी ( ८५ लाख )चणकापूर ( १ कोटी )शिवभांडणे (४३ लाख ) कोसुर्डे ( २३ लाख ७७ हजार ) लिंगामे ( ६६ लाख ) भांडणे हातगड ( ३३ लाख ) गणोरे ( १ कोटी ९९ लाख ) पिंपळे खुर्द ( ६२ लाख ) लखाणी ( ४३ लाख ) मोहबारी ( ९४ लाख ) धार्डेदिगर ( ८८ लाख ) कन्हेरवाडी ( ५६ लाख )नाळीद ( ७७ लाख) जयदर( ७८ लाख) दरेगाव वणी (८३ लाख ) मुळाने वणी ( १ कोटी १४ लाख ) प्रतापनगर ( ८४ लाख ) बिलवाडी ( ३३ लाख) मळगाव खुर्द ( ९१ लाख ) कुंडाणे ओतूर ( ९३ लाख ) गांगवण (५६लाख ) देवळी वणी ( १ कोटी ) खर्डेदिगर ( २ कोटी ३२ लाख ) जिरवाडे हातगड ( २४ लाख ) आदी ४० गावांच्या योजनांना मंजुरी मिळाल्याने येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे.
सुरगाणा तालुक्यातील वाळूटझिरा (६६ लाख ) भवानदगड (५७ लाख )करंजूल क. ( १ कोटी ३० लाख ) माणी ( १ कोटी ११ लाख ) मांधा (१ कोटी ३७ लाख ) उंबरठाण ( १ कोटी ) खिरमाणी (६९ लाख ) सायळपाडा( ४७ लाख) मोधळपाडा ( ७१ लाख ) श्रीरामपूर ( ८८ लाख ) करंजळी ( १ कोटी २५ लाख ) भदर (१ कोटी ५८ लाख ) बोरचोंड ( ५६ लाख ११ हजार ) पोहोळी (१ कोटी ११ लाख ) म्हैसखडक( १ कोटी १८ लाख ) श्रीभुवन ( १ कोटी ८४ लाख )रगतविहीर ( १ कोटी ५१ लाख ) खोकरविहीर ( ८१ लाख )खडकीदिगर (३६ लाख )बर्डीपाडा (३५ लाख ५३ हजार ) उदमाळ (४३ लाख ५७ हजार ) चिंचले ( १ कोटी ५६ लाख ) पिंपळसोंड (७९ लाख ) केळवण (३३ लाख )झगडपाडा (३१ लाख ५७ हजार ) हट्टी बु (१ कोटी १६ लाख ) मांगधे (८३लाख )हस्ते (५७ लाख) कोठूळा( ७५ लाख ) मास्तेमाणी (५३ लाख )आदी ३० गावांच्या योजनांना मंजुरी मिळाल्याने येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे.
६५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
कळवण तालुक्यातील ४० गावांना, सुरगाणा तालुक्यातील ३० गावांना जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांना ६५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्न असून कळवण व सुरगाणा तालुक्यात प्रत्येक घरी नळ जोडणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
– आमदार नितीन पवार