कळवण – पतीच्या छळास कंटाळून कनाशी (ता. कळवण) येथील माहेरवाशिन असलेल्या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अभोणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती मयूर सोनवणे यास अटक केली आहे.अधिक माहिती अशी की भरवीर (ता. इगतपुरी) येथील सासरवाडी असलेल्या मोनाली मयूर सोनवणे (२३) या बाळंतपणासाठी माहेरी वडील प्रभाकर गायकवाड कनाशी येथे आल्या होत्या प्रस्तुती नंतर बुधवार (दि. १२) मोनाली सासरी जाणार होत्या. परंतु मंगळवारी (दि. ११) रात्री एक वाजता पती मयूर सोनवणे याने फोन केल्यानंतर मोनाली घराबाहेर गेली होती. सकाळी कनाशी शिवारात एका विहीरीत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची खबर तिचे चुलते तेली समाजाचे कार्यकर्ते कैलास गायकवाड यांनी पोलिसात दिली पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा गुन्हा दाखल केला.
सासर कडील लोकांकडून जमाव करत माहेरच्या लोकांना मारहाण…
दरम्यान, कनाशीत येथे अंत्यसंस्कार आटोपून अभोणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या मोनालीच्या आईसह तिच्या माहेरच्या लोकांना पोलिस ठाण्याच्या गेटबाहेर गाठून तिच्या सासरच्या लोकांनी धक्काबुकी व मारहाण केल्याने भयानक स्थिती उद्भवल्याने मोठी गर्दी उसळली होती, त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली, चिघळणारे चित्र बघून ठाण्यातील सर्व पोलिस लाठ्याकाठ्यांसह गेट बाहेर धावत वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.