कळवण,– स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा निश्चितच विकास आणि उन्नती होईल त्यासाठी ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याची बचत गटांची निर्मिती करुन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कळवण रोटरी क्लबने पुढाकार घ्यावा असे आवाहन पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कळवण कडून राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षणक्षेत्रात सेवाभावी समाजाभिमुख कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी नेशन बिल्डर टीचर्स अवार्ड तालुक्यातील शिक्षकांना दिला जातो. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून पदमश्री नीलिमा मिश्रा बोलत होत्या. प्रमुख अतिथी डॉ जे डी पवार यांनी सांगितले की देशातील खासदार ,आमदार ,जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हे बौद्धिक क्षेत्रातील प्रगती करू शकत नाही. त्यासाठी शिक्षकच खऱ्या अर्थाने बौद्धिक क्षेत्राची उन्नती करतील असे सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री निलिमा मिश्रा, गुरुदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ जे डी पवार, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव,विस्ताराधिकारी शितल कोठावदे रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश भामरे सचिव संभाजी पवार, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नयना पगार,सचिव निर्मला संचेती ,रोटरॅक्ट अध्यक्ष केतकी पगार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश भामरे यांनी केले तसेच विलास शिरोरे यांनी रोटरी कार्याची माहिती दिली. रोटरीचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. जे.डी.पवार यांना रोटरीचे सह प्रांतपाल विलास शिरोरे,जितेंद्र कापडणे, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते नीलिमा मिश्रा यांच्या हस्ते देण्यात आला. रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कळवण तालुक्यातील २१ आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली असून ग्रामीण भागात कोरोना संक्रमण काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने वाडीवस्तीवर प्रत्यक्ष गृहभेटी देत विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षकांनी केले म्हणूनच शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील शिक्षकांमधून शामकांत जगताप ( ककाणे), संदीप आहेर ( शिंदेवाडी), महेंद्र भामरे (वीरशेत), कमल महाले (कनाशी), विलास भोये ( सप्तशृंगी गड),चंद्रकला चव्हाण (अभोणा मुले), स्वप्नील गजभिये (काठरे दिगर), दिनेश गावित (जुनी बेज),दिपाली आहेर (दह्याने ओ),गोपीनाथ गायकवाड (उमरेबन) ,मीना साळुंके (साकोरेपाडा) ,मीना निकम (जयदर), कैलास पवार (दळवट) धनंजय देवरे (भगू्रडी),वैशाली जगताप (सरले दि),मनोजकुमार अहिरराव (देवळीवणी) , रुपाली गायकवाड (रवळजी), प्रकाश भोये (ओझर), विजया बिरारी (शिरसमणी) दीपक देवरे (एसपी मानूर) मुख्याध्यापकातून विकेश बागुल (अभोणा ) व केंद्रप्रमुखांमधून देविदास पगार (बंधारपाडा) यांना नेशन बिल्डर अवॉर्ड प्रमाणपत्र , ट्राफी व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. कार्यक्रमासाठी संघटनेचे विभागीयअध्यक्ष महारू निकम , प्राचार्य बी एन शिंदे, राजेश मुसळे ,गंगाधर गुंजाळ, ,मोहन संचेती, संंजय बगे,प्रमोद सुर्यवंशी, निंबा पगार, डॉ. आर. डी. भामरे, डॉ. एस. बी. सोनवणे, बापू कुमावत, प्रा. व्ही.डी. सोनवणे,डॉ. रवींद्र पगार,अविनाश पगार,गंगा पगार, ,डॉ तुषार पगार, अँड भाऊसाहेब पवार,प्रविण संचेती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत सोनवणे व आभार प्रदर्शन संभाजी पवार यांनी केले