कळवण – आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वज यात्रेचे कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघातील कळवण तालुक्यात उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तश्रुंगी निवासनी देवीच्या गडावर पहिल्या पायरीवर पूजन करुन दर्शन घेत ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार यांनी ध्वजपूजा करुन यात्रेचे स्वागत केले. यात्रेचे प्रमुख स्वराज्य रथ सेवेकरी ऋषिकेश करभाजन, नाना गवळी यांचा यावेळी सौं जयश्री पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सप्तश्रुंगी गडावर ढोल ताशा आणि मराठमोळ सामळ्याच्या गजरात जय अंबेचा जयघोष करत स्वराज्य ध्वजाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. सप्तशृंगी गड ग्रामस्थांनी आणि देवी भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने स्वराज्य ध्वजाचे स्वागत केले.
सप्तश्रुंगी निवासनी देवी ट्रस्टचे विश्वस्त व अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व ग्रामस्थांनी ‘स्वराज्य ध्वजा’ची पूजा केली.यावेळी राजेश गवळी, संदीप बेनके,अजय दुबे,, दीपक जोरावर , शांताराम गवळी, शांताराम सदगीर,गणेश बर्डे, प्रवीण दुबे, तुषार बर्डे, वैभव धुमसे, रोहित आहिरे, वसंत साळुंखे, दिलीप बर्डे, विजय दुबे, मधुकर गवळी जुगल उपाध्ये, रमेश पवार, योगेश कदम, ईश्वर कदम, राहुल पोटे व महिला भगिनी,स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
७४ ठिकाणी ध्वज जाणार
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शिवपट्टण अर्थात खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच ध्वज उभारला जात आहे. ही यात्रा कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत दुपारी सप्तश्रुंगी गडावर तिचे आगमन झाले.लोकसहभागातून महाराष्ट्रासह देशभरातील विविध ७४ प्रमुख आध्यात्मिक, धार्मिक ठिकाणे तसेच संतपीठे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले या शक्तीपीठांच्या ठिकाणी तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड) आदी ठिकाणी ध्वज नेण्यासाठी स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वराज्य ध्वज’ उभारणी करून ऐतिहासिक वारसा जपणे, पुढील पिढीला स्वराज्याच्या अकल्पित शौर्याची, मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय जेथे झाला त्या खर्डा किल्ल्याच्या इतिहासाची माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. दसऱ्याच्या दिवशी ध्वजाची प्रतिष्ठापनास्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या शौर्याचे, पराक्रमाचे नवे आयाम स्थापित करून महाराष्ट्राची महती अजरामर करणाऱ्या मावळ्यांच्या कीर्तीची साक्ष असलेल्या खर्डा येथील किल्ल्याच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
या कारणामुळे स्वराज्य ध्वजाची संकल्पना
विनम्रता, परमार्थ व त्याग शिकवणारा हा भगवा ध्वज महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची ओळख अवघ्या देशात ठसवणा-या भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे आमदार रोहित पवार यांनी स्वराज्य ध्वजाची संकल्पना साकारली आहे.
सौं जयश्री पवार, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नाशिक