कळवण -नवीबेज ग्रामपंचायत हद्दीतील २०० हेक्टर गायरानवर होणारी अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी सनदशीर मार्गाने प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधत आहे मात्र प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ नवीबेज ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात कोल्हापूर फाट्यावर तासभर ठिय्या आंदोलन करुन लक्ष वेधले. दरम्यान आंदोलनस्थळी चर्चे दरम्यान गायरान कृती समितीचे नेते देविदास पवार व प्रशासकीय यंत्रणेशी शाब्दिक चकमक उडाली.त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका यावेळी समितीचे नेते पवार यांनी बोलून दाखवली तर पोलीस यंत्रणेने कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका घेण्याचे सांगितल्यामुळे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे असतांना तहसीलदारांच्या मध्यस्तीने चर्चेदरम्यान आंदोलकांच्या दोन्ही मागण्या मान्य केल्याने रस्त्यावरील ठिय्या आंदोलन मागे झाला .
महसूल व पोलीस प्रशासनाने त्या आदिवासी बांधवावर प्रतिबंधनात्मक कारवाई करण्याचे व गायरान परिसरात कोणीही जाणार नाही म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची सहमती दर्शविल्यामुळे प्रशासनाच्या विनंतीवरुन आंदोलन मागे घेत असल्याचे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार यांनी आंदोलनस्थळी सांगितले मात्र प्रशासनाने दिलेल्या शब्दानुसार आश्वासनाची पूर्तता केली नाही तर सकाळी १० वा नवीबेज मंदिर पारावर आंदोलनाची नवीन दिशा ठरविण्यात येणार असल्याचे श्री पवार सांगितले.त्या दोन आदिवासी माजी सरपंचावर गेल्या २२ दिवसापासून कुठलीही कारवाई करत नसल्याने दिवसेंदिवस वृक्षतोड होत आहे. अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या आदिवासी बांधवावर वनसंपदा संपुष्टात आणली म्हणून कुठलीही कारवाई होत नाही, ग्रामस्थ सनदशीर मार्गाने निवेदन देऊन चर्चा करुन आंदोलन करुन प्रशासनाला सहकार्य करीत आहे तरीही वृक्षतोड थांबत नाही, प्रशासन मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेळकाढू धोरण अवलंबन करीत असल्याचे गायरान कृती समिती व ग्रामस्थांना निदर्शनास आल्यामुळे त्या आदिवासीवर वृक्षतोंडी संदर्भात गुन्हे दाखल करा, गायरान जमिनीला संरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी नवीबेज ग्रामस्थांनी आज आक्रमक होऊन कोल्हापूर फाट्यावर तासभर ठिय्या मांडून प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले.जो पर्यंत त्या आदिवासीवर कारवाई होत नाही तो पर्यंत रस्त्यावरुन उठणार नाही अशी भूमिका आंदोलक ग्रामस्थांनी घेतल्यामुळे आंदोलनस्थळ परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी तहसीलदार बी ए कापसे, पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांशी चर्चा केली मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम असल्यामुळे महसूल, पोलीस यंत्रणेने आंदोलन स्थळापासून बाजूला चर्चा करुन एकमत केल्यानंतर आंदोलक नेत्याशी चर्चा केली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी घनश्याम पवार, पोपट पवार, अँड भाऊसाहेब पवार, शरद निकम, तुळशीराम देवरे यांनी भूमिका स्पष्ट करुन घटनास्थळावरील परिस्थिती स्पष्ट करुन प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी धनंजय पवार,दीपक खैरनार,अँड भाऊसाहेब पवार, घनश्याम पवार पोपट पवार,साहेबराव पवार, नितीन खैरनार, विनोद खैरनार,मधुकर वाघ,चंद्रकांत पवार,हरी पवार, बाळासाहेब देवरे, प्रल्हाद देवरे, माणिक देवरे, बाळासाहेब खैरनार, दादा महाजन, नरेंद्र वाघ, विशाल वाघ, दीपक खैरनार शशिकांत खैरनार,रमेश खैरनार,नितीन पवार, समाधान पवार,दीपक पवार आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोघांचा चर्चेस नकार –
नबीबेज गावातील गट नं ८,११ व १२ या गायरान क्षेत्रातील वृक्षतोड देवरे वस्ती, बच्छाव वस्ती आणि सिडको वस्ती येथील आदिवासी बांधव
अवैध रित्या करीत जात असून स्थानिक ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेच्या फेऱ्यामध्ये या वस्तीवरील ७० टक्के आदिवासी बांधवानी वृक्षतोड थांबविण्याचे मान्य केले.मात्र माजी सरपंच मधुकर गांगुर्डे आणि माजी सरपंच सौं सरुबाई जाधव वा इतर सहकार्याना ग्रामस्थांनी चर्चेस बोलविले असता या दोन्ही माजी सरपंचांनी वृक्षतोड करुन गायरानवर हक्क असल्याचे सांगून चर्चेस नकार देऊन आम्ही आमच्या मुद्दावर ठाम असल्याचे सांगितल्यामुळे यांना नेमकी वरदहस्त कोणाचा यावर दिवसभर गावात चर्चा रंगली