कळवण– रक्षाबंधन म्हणजे बहीण -भावाच्या अतूट नात्याचा दिवशी अपघातग्रस्त बहिणीला आमदार असलेल्या नितीन पवार या भावाने तात्काळ मदतीचा हाथ दिल्याने वेळीच उपचार मिळाल्याने मिळालेली वेळेची मदत महत्वपूर्ण ठरली. याबाबत अधिक माहीती अशी की, कळवणचे आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार हे आपल्या खासगी वाहनाने कळवणकडे जात असतांना मानूरच्या शरद पवार इंटरनॅशनल स्कुलजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली. त्यात श्रीमती दुर्गा खैरे या महिला गंभीर जखमी झाल्या. त्या रक्षाबंधन निमित्ताने आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जात होत्या. त्यानंतर काही वेळात त्याच रस्त्यावरुन आमदार नितीन पवार हे मतदार संघात जात असतांना अपघातग्रस्त स्थळी पोहोचले. आमदार पवारांनी अपघातग्रस्ताची चौकशी करुन दिलासा दिला. श्रीमती खैरे या जखमी झाल्याने त्यांना तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे ओळखून आमदार पवार यांनी प्रसंगावधान ओळखून स्वतःच्या वाहनाने कळवण उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तांना दाखल करुन वैद्यकीय यंत्रणेला तात्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्या. आज अपघात म्हटला की बघणारे जास्त आणि मदत करणारे आणि त्याचा व्हिडीओ करणारे जास्त असल्यामुळे वेळीच मदत न मिळाल्यामुळे अनेक वेळा अपघातात अनेक वाईट घटना घडल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थिती आमदार नितीन पवार यांनी प्रसंगावधान राखून जखमी बहिणीला स्वतःच्या गाडीने उपजिल्हा रुग्णालयात नेऊन मदतीचा हात देऊन अनोखे रक्षाबंधन करुन तिला वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे.वेळीच उपचार मिळाल्याने खऱ्या अर्थाने वेळ गोल्डन आवर ठरली. वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार यांच्या सुचनेनुसार दोन्ही अपघातग्रस्तांना सत्वर उपचार झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असून अपघातग्रस्तांना आमदार पवारांच्या रुपाने देवदूत धावून आल्याने जीवदान मिळाल्याची भावना अपघातग्रस्त आणि आरोग्य यंत्रणेने व्यक्त केली.